" मग येतेस का ?"
" कुठे जाणार आहे ?"
" जाउ कुठेतरी"
" आई परवानगी नाही देणार"
" कशावरुन ?"
" ती माझी आई आहे, तिचा स्वभाव माहिती आहे मला."
" अगं, सकाळी जाऊ अन पाच वाजेपर्यंत परत येउ."
" अरे माझी आई नाही परवानगी देणार. तुला नाही माहिती तिचा स्वभाव."
" एक दिवसासाठी सुद्धा नाही."
" उंहू"
" च्च."
" नाराज झालास."
" ........."
" ए बोल ना"
" काय बोलु"
" थोडा माझा विचार कर नं, प्लीज."
" आपली मैत्री होउन एक वर्ष होतयं. पण एकाच शहरात असुन सुद्धा आपण एकदाही भेटलो नाही. तुला कधी भेटावसं वाटत नाही ?"
" वाटतं रे, पण..... माझा नाईलाज आहे"
" हे तुझं नेहमीच आहे."
" .............."
" मी पुढ्च्या महिन्यात नागपुरला जातोय."
" का?"
" माझी बदली झालीय."
" मग परत ?"
" कदाचित कधीच नाही."
" मग आपली भेट केंव्हा होणार ?"
" म्हणुन म्हणतोय, एखाद्या रविवारी भेटूया, सोबत छान लंच घेउ. एकदा तुझ्या आईला विचार तर खरं. का मी विचारु?"
" नाही त्याची गरज नाही. मी येईन."
" तुझी आई परवानगी देईल ?"
" मी सांगेन, मैत्रिणीसोबत जातेय म्हणुन."
"....................."
" आता तरी खुश ?"
".............."
" का ? काय झालं?"
" तुला वाईट वाटणार नसेल तर एक गोष्ट सांगु."
" तू बदलीची थाप मारलीस ? जाउ दे. मी येईन तुला भेटायला."
" नाही, बदलीतर झालीच आहे. पण तु नको येऊस भेटायला."
" वेडा आहेस की काय तु ? आतापर्यंत मी नाही म्हणत होते, तर आग्रह करत होतास, अन आता येते म्हणतेय, तर नको म्हणतोय...... झालं काय तुला ?"
" आपलं नातं काय आहे."
" अरे काय झालयं तुला ?"
" सांग नं काय नातं आहे आपलं ?"
" मैत्रीचं ! का ? अचानक का विचारतोय ?"
" हे अपवित्र वा घाणेरडं नातं आहे, असं वाटतय का तुला ?"
" ए काहीतरीच काय बोलतोय. मी कधी म्हटलयं का कधी ? पण तुझ्या डोक्यात हे आलचं कसं ?"
" मग तुला खोटं बोलायची गरज काय ?"
" पण आई............."
" जर तुझाच या नात्यावर विश्वास नसेल तर तू तुझ्या आईचा विश्वास बसेल ?"
"..........."
" सॉरी बेबी, पण जर तुला मला भेटायला तुझ्या जन्मदात्या आईशी खोटं बोलावं लागत असेल, तर तू मला नाही भेटलीस तरी चालेल. माझ्या मैत्रीला नाव ठेवलेलं मला पटणार नाही."
" ........... "
" तु विचार कर अन कळव मला. अजुन एक महीना बाकी आहे."
" माझं चुकलं. मी खोटं नाही बोलणार. मी बोलते आईशी. वाटल्यास, तुझ्याशी तिला बोलायला सांगते. चालेल नं ?"
" आता कशी शहाण्यासारखी बोललीस."
" ठेवू मग आता ? मी लगेच आईशी बोलते. "
" ओके, बाय."
२ टिप्पण्या:
तुम्ही चांगले लिहता. तुमचे लेखन लोकांन पर्यत पोहचवण्यासाठी ब्लाँग www.marathiblogs.net वर रजिस्टर करा. विशालशोध कसा वाटतो कळवत रहा.
सहमत.. http://marathiblogs.net/ ही एक उल्लेखनीय साईट आहे.
माझ्या ब्लॉगपर्यंत तुम्ही कदाचित त्यामुळेच पोहोचू शकला असाल..
विशालशोध यांच्या सल्ल्याचा जरूर विचार करा..
टिप्पणी पोस्ट करा