"Where are you from?"
नेहमीचा प्रश्न. पण उत्तर बदलतय.
पुर्वी मी अमरावतीला असताना ’घाटंजी’ सांगायचो.
नंतर इंदौरला, बरेली-मेरठ (मिरत)ला असतांना ’महाराष्ट्र’ तर मुंबईत असताना ’यवतमाळ जिल्हा’.
अन आता "India".
माणसाची ओळख कशी बदलत जाते.
अमरावतीला एम.एस.सी.च्या गृपमध्ये वणीवाले मित्र जवळचे वाटायचे, काय तर ते माझ्या जिल्ह्यातले म्हणून. अन आता....
देशाच्या कुठल्यातरी कोपऱ्यावरचा, तर कधीकधी पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश इथले लोक सुद्धा जवळचे वाटतात. शेवटी काय, माणुस इथुन तिथुन सारखाच, देशाच्या, राज्याच्या सीमा त्याला वेगळे करतात इतकच.
५ टिप्पण्या:
एकदम पटलं. मस्त.
Chaan lihiley.... :)
Thanks a lot.
मस्त !
(अहो तुमच्या जुन्या पोस्ट दिसत नाहियेत..!!)
आपण माझ्या पोसमटवर टिप्पणी दिलीत पण तुमच्या ब्लॉगवर ईमेल पत्ता नाही. म्हणून धन्यवाद कळविण्यासाठी हा मार्ग वापरला. तुमची where are you from ही नोंद झकास, फार आवडली.
टिप्पणी पोस्ट करा