शुक्रवार, १६ जुलै, २०१०

सुपारी

"काय रे, खूप उडायला लागलास तू ? "

"कोण बोलतंय ? "

"तुझा बाप.... xxxx .. ओळखलं नाही का ? "

"अं... नाही. "
"मी बंड्यादादा बोलतोय.... चल हप्ता पोचव पटकन नाहीतर ... "

"नाहीतर .......... "

"नाहीतर तुला पोचवीन... हि हि हि ... "

*************************

"का रे .... तू मला काय येडा समजलास काय ? "

"......... "

"तू पोलिसांकडे कंप्लेंट केली ते मला समजत नाय काय ? अबे भुक्कड.. जगायचं असेल तर ५०,००० पोचव ..... नाहीतर तुझा तेरावा घालीन मी.... समजला काय ? बंड्यादादा म्हणतात मला"

************************************

"हॅलो"

"बंड्या को देना"

"बोल रहा हूं ... तू कौन है बे ? "

"तुला पैसा पायजे का माझं नाव ? "

"काम बोल"

"टपकाना है"

"किसको ?"

"डॉ. घोटकर"

"क्यू ? "

"तेरेको क्या लेना देना ... तू पैसे ले और ... "

"ऐ, वो अपून को ५०,००० का हप्ता देगा... "

"मी तुला १० लाख देतो ... बोल ? "

"पण ... कोंबडी खतम करून ... "

"पाहिजे का ठेवू ? "

"ऍडव्हान्स ? "

"ठीक आहे पण ५०,००० चं देणार.. बाकी काम झाल्यावर... "

"पण ... "

"पाहिजे का ........?"

"बरं... "

"अजून एक ... "

"आता काय ?"

"त्याच्या अंगावरच सोनं काढायचं आणि चाकूने त्याला खतम करायचं"

"पण .... "

"जसं सांगितलं तसच करायचं .... काय समजलास ... घोडा नाही वापरायचा.... "

"ठीक आहे, आपल्याला काय ...... पण ऍडव्हान्स"

"ठीक आहे. आज रात्री ११ वाजता ..... "

**********************************

"हॅलो, वाळकेश्वर पोलिस चौकी"

"हॅलो, मी डॉक्टर घोटकर बोलतोय ... "

"आता काय आहे ... अरे रात्रीसुद्धा त्रास देता हो ... तुमची कंप्लेंट घेतली होती ना लिहून ..."

"अहो माझ्या हातून खून झालाय .... "

"काय ? कुणाचा ? "

"ते माहिती नाही... पण कोणीतरी चोर असावा ... "

**********************************

"स्वतःचा बचाव करण्यासाठीच डॉ. घोटकरांनी गोळी चालवली, हे सिद्ध झाले आहे. पोलिसांनी त्यावर विश्वास ठेवून लगेच अँब्युलंस पाठवली असती तर कदाचित मयत बंड्या वाचला असता. त्यामुळे डॉ. घोटकरांना निर्दोष सोडण्यात येत आहे.......... "

***********************************

"चला सुटलो एकदाचा.... महिना ५०,००० पेक्षा एकदाचे ५०,००० परवडले .... "

४ टिप्पण्या:

हेरंब म्हणाले...

हा हा .. सहीये !!

Unknown म्हणाले...

Chaan Deshamukha Mahoday. Vachatanaa Majja Aali.
Ny-USA
20=7-10

Aakash म्हणाले...

वाह! खमंग लिखाण आहे. सकाळ पासून सगळे पोस्ट वाचून काढले. आता सगळ्यांची मिळून एकाच प्रतिक्रिया लिहायला हा पोस्ट निवडला.
तसा सगळ्यात विशेष आणि धरून ठेवणारा पोस्ट म्हणजे > मैत्रीण < वाह मजा आली सरजी.

कातीन-किडा हि संकल्पना जवळ जवळ विसरलो होतो! आज अचानक पाहिल्म्प्यारा, दूध-मोगरा, कातीन-किडा, सोन्याचा विडा ...... सगळी नावं घडा घडा समोर आली! आपण तर फिदा झालो बुवा!

Vijay Deshmukh म्हणाले...

हेरंब, सावधान आणि आकाश, आभारी आहे.