गुरुवार, २२ जुलै, २०१०

मराठ्यांचा इतिहास ?

डिसेंबर १२९३ ला, ५०० मैलांवरुन आलेल्या अल्लाउद्दीन खिलजीने ८००० स्वारांनिशी देवगिरीवर हल्ला केला, त्यावेळी शंकरदेव यादव (राजपुत्र आणि सेनापती) खूप सारं सैन्य घेऊन दूर कुठेतरी गेला होता. देवगिरीवर असलेल्या ४००० स्वारांसोबत राजा रामदेवरायाने प्रतिकार केला पण तो तोकडा पडला. त्याने शेवटी तह केला.

पण हि बातमी कळताच शंकरदेव यादव परत आला तो मोठी फौज घेऊन देवगिरीच्या रक्षणासाठी आला. पण एका अफवा पसरली. दिल्लीहून फार मोठी येणार आहे. या अफवेने घाबरून राजा रामदेवराय शंकरदेवाच्या मदतीला आलाच नाही. शंकरदेवाने खिलजीच्या सैन्याला चांगलेच झोडपून काढले, पण त्याच वेळी देवगिरी किल्ल्याच्या मागे असलेली १००० स्वारांची फौज खिलजीच्या मदतीला आली. त्यांच्या घोडांच्या टापांनी इतकी धूळ उडवली की फारसं काही दिसत नव्हतं. त्यामुळे सैन्याला वाटलं की दिल्लीहून येणारी अफाट फौज म्हणजे हिच ती. आणि यादव सेना घाबरून पळायला लागली. ६ फेब्रु. १२९४...

खंडणी दिली गेली... किती ? ६०० मण सोनं, ७०० मण मोती, २ मण हिरे-माणकं आणि १००० मण चांदी, ..... आणि रामदेवरायाची मुलगी.... (संदर्भ :- बाबासाहेब पुरंदरे.... )

मराठी सेना हरली ती कशामुळे ? केवळ एका अफवेमुळे, की रामदेवरायाच्या अनाठायी भीतीने? की आक्रमणाला सज्जच नसलेल्या रामदेवरायाच्या अदूरदर्शीपणामुळे ? की मराठी माणसं त्यावेळच्या संतांनी दाखवलेल्या भक्ती-मार्गाला लागल्यामुळे ?

तेव्हापासून जो दिल्लीचा दरारा बसला, तो छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे वगळता तो आजतागायत कायम आहे, हे आपलं दुर्दैव का आपल्या कर्माची फळं.....

ह्या आक्रमणापूर्वी असलेल्या संपन्न महाराष्ट्राचा इतिहास अगदीच थोडक्यात शिकवला जातो.... आता तर "कोथळा"ही पुस्तकातून काढून टाकलाय. मराठी माणूस पेंढा भरून ठेवलेला वाघ झालाय का ?

का म्हणून आम्हाला आमचा वैभवशाली इतिहास शिकवला जात नाही ? फक्त देशमुख-देशपांडे आणि त्यांच्या वतनदारी.... आणि थोडक्यात छत्रपतींचा इतिहास... बस्स ? आम्हाला मुळातूनच अस्मितारहित करण्याचे कारस्थान खिलजीपासून आजपर्यंत चालूच आहे का ?

स्वातंत्र्यपूर्व काळातही इतिहास गांधीजी आणि नेहरू यांच्याच भोवती फिरतो. त्यावेळी महाराष्ट्रात कोणी नेतेच नव्हते? इथे स्वातंत्र्यचळवळ झालीच नाही ? मग तिचा इतिहास कुठे गेला ? का आम्ही लाचारच राहावं म्हणून तोही झाकला जातो ?

हत्तीच्या पिल्लाला बांधण्यासाठी जाडजूड दोरखंड बांधले जातात, मात्र मोठ्या हत्तींना साधी साखळीही पुरते, कारण त्याची प्रतिकार करण्याची इच्छाच मरून गेली असते.... असाच मराठी माणूस झालाय का ?

ज्या छत्रपतींनी शाहिस्तेखानाची (ज्याची फौज १ लाख होती) बोटे छाटली, त्यांच्याविषयी भलतंसलतं लिहिणाऱ्या लेखकाच्या पुस्तकावर भारतात बंदी घलू शकत नाही.... त्याची बोटे धजलिच कशी असं काही लिहायला.... का आम्हीच सुर्याजीचे वंशज निर्माण करून स्वतःलाच मातीत घालतोय ...... कशासाठी ... कशासाठी ?

११ टिप्पण्या:

Unknown म्हणाले...

Agadi yogy lihiliye.. patale...adhicha itihas lapavun thevala aahe.. itke shur zale ajunahi kahi mahit nahi.. Pahilya Bajirao chi Janma tithi kityek lokana thouk asnar aahe?..

sharayu म्हणाले...

इतिहासाचार्य राजवाडे यानी लिहिलेल्या माहीमची बखर
या पुस्तकावरून अल्लाउद्दीन खिलजी-रामदेवराव यादव
यांच्यासंबंधात घडलेला इतिहास शिकविल्या जात असलेल्या इतिहासापेक्षा वेगळा असावा असे वाटते.

लीना मेहेंदळे म्हणाले...

Nice posts, one would not know if your subject is Physics or History ( I think it is DESH-CHINTAN)
Pl send ur email id at leena.mehendale@gmail.com or call me at +919449082290. thanks

Vijay Deshmukh म्हणाले...

@ Gaurav :- खरं आहे. आम्हालाच आमच्या लोकांची किंमत नाही. आजच मनोगतवर आलेली एक प्रतिक्रिया, "बाजीरावाच्या पुतळ्याखाली एका इंग्रजी इतिहासकाराचं वाक्य आहे - बाजीरावानं नेपोलिअनपेक्षा जास्त प्रदेश पादाक्रांत केला. नेपोलिअन दोन वेळा पराजित झाला, बाजीराव एकदाही नाही!"

आता बोला..!

म्हणजे इतर श्रेष्ठ नाहीत असं नाही, पण ज्याचं त्याचं श्रेय ज्याला त्याला द्यायला हवं..

प्रतिसादाबद्दल धन्यवाद

Vijay Deshmukh म्हणाले...

@ शरयु :- शक्य आहे. इतिहास आपल्या पुर्वजांनी केलेल्या पराक्रमाची एक गाथा असतो, हे आपल्याला विसरायला लावत आहेत की काय.
एका फॉरवर्ड इमेलमध्ये भारताला स्वातंत्र्य दिले गेले, भारताने मिळवले नाही अश्या आशयाचा मजकुर असलेलं चर्चिलचं पत्र फिरतय, अन आपण गप्पच बसतो... आपण अस्मिता घालवुन बसलोय, हेच खरं.

Vijay Deshmukh म्हणाले...

@ Leena Mehandale :- धन्यवाद मॅडम. खरं तर हा इतिहास मीसुद्धा प्रथमच ऐकतो आहे. बाकी इमेल केलाच आहे.

अनाकलनीय म्हणाले...

मराठ्यांचे कर्तुत्व हे चवथीच्या इतिहासापर्यन्तं स्तिमित ज्हाले ही सध्यपरिस्थिति आहे.

sudeepmirza म्हणाले...

good post!

underlining the need of re-discovering OUR history beyond so-called Textbooks...

Keep it up!

सौरभ म्हणाले...

खुप छान लिखाण आहे. खुप आवडल. अव्वल एकदम. :) सगळेच पोस्ट्स कमाल आहेत. प्रत्येकावर वेगळी प्रतिक्रिया नाही देऊ शकत, म्हणून इकडेच देतोय... भन्नाट...

Vijay Deshmukh म्हणाले...

अनाकलनीय, सुदिप आणि सौरभ धन्यवाद.

अनाकलनीय, अगदी खरं बोललात. यापलिकडे जायला कोणाला वेळही नाही, हे दुर्दैव. नुकतीच राजा शिवछत्रपती मालिका बघतोय, बघुन बरे वाटले. किमान आपण आपल्या पुढच्या पिढीला मालिका तर दाखवु शकतो.

THANTHANPAL म्हणाले...

मोगल काळात देल्हीच्या तख्ताला आव्हान देणारे भारतात फक्त २ राज्ये होती एक मेवाडचा मेरुमणि महाराणा प्रताप आणि दुसरे महाराष्ट्रातून शिवाजी महाराज. शिवाजीची औरंगजेबाने एव्हढी दहशत घेतली होती की त्याने शिवा शिवा करतच दक्षिणेत स्वारी करून तेथेच प्राण सोडला. तेंव्हा पासून देल्हीच्या तख्त्ताला महाराष्ट्रा बद्दल आकस आहे.त्यात नेहरूला चिंतामणराव देशमुख यांनी महाराष्ट्राचे पाणी दाखवले या मुळे देल्हीचा महाराष्ट्रा बद्दल आकस फारच वाढला. सत्य परिस्थिती ही आहे की जेंव्हा जेंव्हा देश संकटात सापडला तेंव्हा सहयाद्री हा हिमालयाच्या मदतीला धावला याचे उदाहरण यशवंतराव चव्हाण.त्याच बरोबर पंजाब मध्ये भिंदरवाला याचा भस्मासुर इंदिरा गांधी यांनी स्वार्था साठी उभा केला , आणि देशाला संकटात ढकलले त्या वेळी General Vaidya Shridhar Vaidya became the 13th Chief Of Army Staff of the Indian Army . In 1984, he planned Operation Blue Star. या करता त्यांना निवृत्ती नंतर अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या. पण महाराष्ट्रने याचे कधी राजकारण केले नाही. खालील पोस्ट नक्की वाचा.
http://thanthanpal.blogspot.com/2010/02/blog-post_02.html पण आपले लाचार नेते राहुलचे जोडे उचलण्यास लाज बाळगत माही . त्याच बरोबर महाराष्ट्रातील साहित्यिक, संपादक, वार्ताहर हे व्ययक्तिक फायद्या साठी गांधी,नेहरू भाटगिरी करतात.